बीसीसीआयने केला कपिल देव यांचा अपमान? फायनलसाठी आमंत्रण नाही

Headlines

वल्ड र्कप फायनलसाठी बीसीसीआयने जोरदार तयारी केली होती. आत्तापर्यंत वर्ल्ड कप जिंकणाऱ्या सर्व कॅप्टन्सला सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, बीसीसीआयने टीम इंडियाला 1983 साली वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या कपिल देव यांना आमंत्रण दिलं नाही. त्यामुळे कपिल देव नाराज असल्याचं पहायला मिळत आहे.

कपिल देव यांना वर्ल्ड कप फायनलमध्ये आमंत्रण दिलं जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना बोलवण्यात आलं नव्हतं. त्यावर एका माध्यमांमध्ये बोलताना कपिल देवने मोठा खुलासा केला आहे. कपिल देव एका कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्या उपस्थितीवरून मोठा प्रश्न उभा राहिला. कपिल देव यांना आमंत्रण नव्हतं का? असा सवाल पत्रकाराने कपिल देव यांना विचारला. त्यावर कपिल देव काय म्हणाले पाहा…
तुम्ही मला आमंत्रित केलं, त्यामुळे मी आलो. त्यांना मला आमंत्रित केलं नाही म्हणून मी गेलो नाही. मला वाटलं होतं की, माझ्या 83 च्या संपूर्ण वर्ल़्ड कप संघाला आमंत्रित करतील, अशी माझी इच्छा होती. मात्र, त्यांच्या कामाचा व्याप मी समजू शकतो. वर्ल्ड कप फायनलची तयारी करणं सोपं काम नाही. खूप काम त्यांच्याकडे असतं. त्यामुळे त्यांनी मला बोलवलं नसेल, असं कपिल देव म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *